वीज साठवण्यासाठी
बॅटरी स्टोरेज प्रणाली
महावितरणचा दोन हजार मेगावॉटचा प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने सौरप्रकल्प उभारणीवर भर दिला असताना, आता वीज साठवण्यासाठी बॅटरी स्टोरेज प्रणाली उभारली जाणार आहे. त्यासाठी तब्बल दोन हजार मेगावाॅट क्षमतेचे बॅटरी स्टोरेज केंद्र उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे एखाद्या वीज केंद्रात बिघाड झाल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास ही वीज वापरता येणार आहे.
महावितरणकडून सध्या राज्यात दररोज कमाल २५ हजार मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली जात आहे. पुरेशी वीज उपलब्ध व्हावी म्हणून औष्णिक, सौर आणि जलविद्युत प्रकल्पातून वीज घेण्याबाबत ४० हजार मेगावाॅटहून अधिक क्षमतेचे वीज खरेदी करार केले आहेत; मात्र ऐनवेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेशी वीज उपलब्ध व्हावी म्हणून महावितरण बॅटरी स्टोरेज प्रणाली उभारली जाणार आहे. ही यंत्रणा खासगी कंपन्यांनी स्वतः उभारून त्याचे संचलन करणे, या तत्त्वावर उभारली जाणार आहे. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत निविदा मागवल्या आहेत. राज्यात वेगवगेळ्या ठिकाणी ही यंत्रणा तयार केली जाणार असून त्याची किमान क्षमता १०० मेगावाॅट असणार आहे. त्यामुळे तेथे साठवलेली वीज गरजेनुसार वापरता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.