मुंबई

जिल्हा रुग्णालयाचे काम ८० टक्के पूर्ण

CD

जिल्हा रुग्णालयाचे काम ८० टक्के पूर्ण
एक हजार ७८ नवीन पदभरती करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून डिसेंबरअखेरपर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी अद्ययावत यंत्रसामग्री घेतानाच एक हजार ७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २९) दिले. हे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे अत्याधुनिक रुग्णालय संपूर्ण महामुंबई क्षेत्रासाठी वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या
बांधकामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायक, वीरेंद्र सिंह, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, आरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी या वेळी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा रुग्णालय कात टाकत असून नवीन अद्ययावत रुग्णालय साकार होत आहे. त्यामध्ये ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण ९०० खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे. त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरण, यंत्रसामग्री बसविणे आदी कामे सुरू आहेत. साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. या ९०० खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे १,०७८ नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करतानाच अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना केल्या. तसेच पदभरतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यास सांगितले.

दर मंगळवारी आढावा
मंत्रालयात जिल्हा रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव नवीन सोना यांना दिले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका रुग्णालयांमध्ये महिला आरोग्य तपासणी मोहीम घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती, त्यांना लागणारी औषधे, साहित्यसामग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री, सचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT