मुंबई

गोकुळधाम पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

CD

गोकुळधाम पतसंस्थेची सर्वसाधारण सभा
शिवडी, ता. ३ (बातमीदार) ः गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांसाठी स्थापन केलेल्या पहिल्या गोकुळधाम कामगार वसाहतीमधील गोकुळधाम पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी, (ता. २) सायंकाळी यशोधाम हायस्कूलमध्ये पार पडली. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष काशिनाथ माटल म्‍हणाले की, आज‌ देशी-परदेशी बँकांच्या स्पर्धेत सहकारी पतसंस्था आपल्याच‌ गोठ्यातील गोमाता आहेत. कधीही आणि केव्हाही दूध घ्या किंवा दूधजन्य पदार्थ खा, त्याला अवाच्या सव्वा कर नाही की जीएसटी नाही, असे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी गिरणी कामगार सदस्यांच्या इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण मुलांचा गुणगौरव करण्यात आला. सभेला मोठ्या संख्येने कामगार सदस्य उपस्थित होते. या वेळी श्रीपाद दिवेकर, संचालक गोविंद आजगावकर, गोकुळधाम फेडरेशनचे अध्यक्ष प्रतापराव महाडीक, उपाध्यक्ष अनंत शिंदे, संचालक लक्ष्मण भेलसेकर, नागेश भांडे, आदिती परब, व्यवस्थापक जया चव्हाण आदींनी सभेत भाग घेतला. लक्ष्मण भांडे, एस. टी. सावंत, विजय सावंत आदी सदस्यांनी ठरावांना पाठिंबा दिला. दरम्यान, संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष श्रीधर तानावडे तसेच अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणारा संदीप तांदळे नेमका कोण? कराडशी काय संबंध?

Bhoom News : रास्ता रोको केल्याने शेतकरी पुत्रावर गुन्हा दाखल; खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

Mangalwedha News : कारसह समुद्रात पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी हिवरगावच्या जवानाची समुद्रात उडी

MP Supriya Sule : सरन्यायाधिशांवरील हल्ल्याची संसदेत चर्चा घडवून आणा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

SCROLL FOR NEXT