मुंबई

भोगवटाधारक इमारतींना नळजोडणी

CD

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : भोगवटा दाखला असलेल्या सर्व नवीन इमारतींना नळजोडणी देणे सुरू करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे अशा इमारतींमध्ये रहायला आलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिरा-भाईंदरला सूर्या धरण पाणी योजनेतून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे, परंतु योजना कार्यान्वित होण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये तत्कालीन आयुक्त संजय काटकर यांनी बहुमजली इमारतींना नवीन नळजोडणी देणे बंद केले. केवळ चार मजली इमारतींना नळजोडणी दिली जात होती. सूर्या धरण पाणी योजना कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत नळजोडणी बंद राहील, असे आयुक्तांनी घोषित केले होते. परंतु मिरा-भाईंदरमध्ये सध्या चार मजली इमारतींची संख्या नगण्य असून सर्वच बहुमजली इमारती उभ्या रहात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाचा फटका नवीन इमारतीत रहायला येणार्‍या रहिवाशांना बसला.

महापालिकेने इमारत बांधकामाला मंजुरी दिली, मग नळजोडणी का दिली जात नाही, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जाऊ लागला. नव्या इमारतीत रहायला येणार्या रहिवाशांना परिणामी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे, मात्र आता दहा महिन्यानंतर आयुक्तांनी निर्णयात बदल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार
ज्या इमारतींना भोगवटा दाखला आहे, अशा इमारतींना नळजोडणी, वीजपुरवठा, मलनिस्सारण जोडणी आदी सेवा संबंधित पुरवठादारांनी द्याव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये दिला आहे. या निर्णयाचा आधार घेत नवीन बहुमजली इमारतींनी महापालिकेकडून भोगवटा दाखला घेतला आहे, अशा सर्व इमारतींना नळजोडणी द्यायला सुरुवात करण्याचा निर्णय आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी घेतला आहे. त्यामुळे बहुमजली इमारतींना नळजोडणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाणीपुरवठ्यामध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून स्टेमकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्यातही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्टेमचे अधिकारी, मिरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी व आमदार नरेंद्र मेहता यांच्यात बैठक झाली होती. स्टेमने शहराला मंजूर असलेल्या कोट्यानुसार म्हणजेच ८४ दशलक्ष लिटर पाणी दिले पाहिजे, असे मेहता यांनी बजावले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून स्टेमकडून दररोज ८४ दशलक्ष लिटर पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात पाच दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. त्याला अनुसरून आयुक्तांनी सेवा पुरवठ्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भोगवता असलेल्या इमारतींना नळजोडणी सुरू करण्यात आली आहे.
- दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT