मुंबई

कॉलम

CD

आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत बँकिंग शिबिर
पालघर (बातमीदार) : आर्थिक समावेशन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत सफाळे येथील घाटीम ग्रामपंचायत येथे बँकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबवली जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक संचालक सुमन रे आणि डॉ. ज्योती सक्सेना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत केवायसी प्रक्रियेचे तसेच आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले. पालघर जिल्हा अग्रणी बँकचे मुख्य व्यवस्थापक विशाल वाघ यांनी आर्थिक फसवणुकीपासून संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले. आर्थिक साक्षरता सल्लागार उज्ज्वला कोकणे यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना यांसारख्या शासकीय विमा योजनांची माहिती दिली. या शिबिरात बँक ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
---
खाटीक समाजाकडून खोतकर यांच्या वक्तव्याचा निषेध
विरार (बातमीदार) : भाजप आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ वसईत खाटीक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत वसई विभागाच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा श्रींगी चौगुले यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन वरिष्ठ पोलिस अधिकारी हर्षल जाधव यांनी स्वीकारले. या शिष्टमंडळात कॅप्टन नीलेश पेंढारी, जितेंद्र कोथमिरे, हेमंत लाड, मोहम्मद सव्वालाखे, रियाज कुरेशी, जावेद शेख, हरेश जाधव, संतोष बागुल, संदीप कोथमिरे, कुणाल प्रभाळे, संदेश जाधव आदींचा समावेश होता. संघटनेचे मार्गदर्शक सुनील जाधव यांनी खोतकर यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या घटनादत्त मूलभूत अधिकारांचा भंग झाल्याचा आरोप करीत पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयीन लढा उभा करण्याचा इशारा दिला.
---
एसटी कर्मचाऱ्यांसाठी नेत्रतपासणी
जव्हार (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जव्हार आगारात आगार प्रशासनाच्या मागणीनुसार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी (ता. ४) मोफत नेत्रतपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात १६७ कर्मचाऱ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी ६७ कर्मचाऱ्यांना तत्काळ चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा डोळ्यांच्या उपचारावरील खर्च वाचणार असून, भविष्यात डोळ्यांच्या आजारांपासूनही बचाव होईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
---
सणासुदीच्या काळात विशेष गाड्यांना पालघर थांबा
पालघर (बातमीदार) : रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-ओखा व वांद्रे टर्मिनस-सांगानेरदरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना पालघर स्थानकावर दोन्ही दिशांना थांबा असेल. वांद्रे-ओखा स्पेशल १४ व १७ ऑगस्ट रोजी वांद्रेहून, तर १६ व १९ ऑगस्ट रोजी ओखाहून धावेल. वांद्रे-सांगानेर सुपरफास्ट ७ व १४ ऑगस्ट रोजी वांद्रेहून, तर ८ व १५ ऑगस्ट रोजी सांगानेरहून सुटेल. प्रवासी संघटनेने डहाणू ते वैतरणादरम्यानच्या स्थानकांवर लोकल फेऱ्या वाढवून सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
---
मनोर मंडळ कार्यालयाचा वृक्षारोपण उपक्रम
मनोर (बातमीदार) : महसूल सप्ताहानिमित्त मनोर मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोंढाण गावाच्या हद्दीत स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण केले. सोमवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या या उपक्रमात मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे, तलाठी विधी भोसले, श्रद्धानंद गायकवाड, भरत सांबरे, कोतवाल श्रीधर रहाणे आणि अजय नाईक यांनी सहभाग घेतला.
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT