मुंबई

रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्य रेल्वेकडून १८ विशेष गाड्या

CD

रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिनानिमित्त १८ विशेष रेल्वे
नागपूर, कोल्हापूर, मडगावच्या प्रवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्याने राज्यभरातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गांवर एकूण १८ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना आरक्षणाची अतिरिक्त संधी मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर मार्गावर एकूण सहा विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०११२३ ही ९ ऑगस्टला रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचणार आहे. परतीचा प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०११२४ ही गाडी १० ऑगस्टला दुपारी २.३० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. यासोबतच ट्रेन क्रमांक ०२१३९ ही १५ आणि १७ ऑगस्टला सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचणार आहे. परतीसाठी ट्रेन क्रमांक ०२१४० ही ट्रेन नागपूर येथून १५ आणि १७ ऑगस्टला रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासाची अधिक सुविधा उपलब्ध होणार असून, गर्दीचा ताणही काही प्रमाणात कमी होणार आहे.
...
कोल्हापूरसाठी गाड्या
कोल्हापूरसाठी सीएसएमटी स्थानकातून ट्रेन क्रमांक ०१४१७ ही ८ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे. परतीसाठी ०१४१८ ही गाडी १० ऑगस्टला दुपारी ४.४० वाजता कोल्हापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
..
मडगावसाठी सेवा
मडगाव मार्गावरून एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) स्थानकातून ट्रेन क्रमांक ०११२५ ही १४ ऑगस्टला आणि ०११२७ ही १६ ऑगस्टला रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगावला पोहोचणार आहे. परतीसाठी ०११२६ ही १५ ऑगस्ट आणि ०११२८ ही १७ ऑगस्टला दुपारी १.४० वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहोचणार आहे. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT