मुंबई

महसूल सप्ताह अंतर्गत निराधार योजनेसाठी ठोस उपक्रम;

CD

महसूल सप्ताहअंतर्गत निराधार योजनेसाठी उपक्रम; निवडणूक प्रशिक्षण

जव्हार, ता.७ (बातमीदार) ः प्रांताधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार तहसील कार्यालयांतर्गत १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांचा नागरिकांना, विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना लाभ झाला असल्याचे येथील तहसीलदार लता धोत्रे यांनी सांगितले. यात निराधार नागरिकांचे मानधन येण्याकरीता डीबीटी प्रणालीवर आधार प्रमाणीकरण, बँक केवायसीसारखी महत्वाची कामे या सप्ताहाच्या अनुषंगाने करण्यात आली.
संजय गांधी योजनेचे मंजूर लाभार्थीचे अनुदान शासनामार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पोर्टलद्वारे जमा केले जाते. काही लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे अनुदान जमा होण्यासाठी अडचणी येत होत्या. अशा नागरिकांच्या घरी जात ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत लाभ देण्यात आला. यात ग्रामपंचायतनिहाय लाभार्थ्यांची यादी अद्यावत करून प्रसिद्ध करण्यात आली.
आधार कार्ड प्रमाणीकरण, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे, केवायसी, हयात दाखला मोबाईल ॲपद्वारे करणे, अनियमित आधार कार्ड नियमित करणे, दिव्यांग लाभार्थी अर्ज भरून घेणे, त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे इत्यादी आनुषंगिक कामे तहसील कार्यालयात आणि लाभार्थ्यांच्या घरोघरी भेट देऊन ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली.

निवडणूक प्रशिक्षण
प्रांताधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, सहाय्यक तहसीलदार लता धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदार यादी पुर्नरिक्षण व सुत्रीकरण पूर्व तयारी याबाबत महसूल साप्ताह कार्यक्रमांतर्गत निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. यात मतदारसंघांमध्ये नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे, नावामध्ये दुरुस्ती, दुय्यम नावे आणि नवीन मतदान ओळखपत्र, वोटर हेल्प ॲप आदींबाबत सविस्तर प्रशिक्षण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांना निवडणूक नायब तहसीलदार वसंत सांगळे, नायब तहसीलदार जव्हार यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

I.N.D.I.A Alliance Meeting Update: राहुल गांधींच्या निवासस्थानी पार पडलेल्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत झाले मोठे निर्णय!

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

UPI Down! गुग-पे, फोन-पे, पेटीएम सेवा कोलमडली, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

SCROLL FOR NEXT