बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी ‘नॉईज बॅरिअर’ पॅनल्स
१८८ किमीचा उड्डाणपूल शांततेच्या कवचात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांवर आता आवाज अडवणारे विशेष ‘नॉइज बॅरिअर’ पॅनल्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रवासादरम्यान ट्रेनचा आवाज शेजारील रहिवासी भागांपर्यंत पोहोचणार नाही आणि एक शांत व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण होणार आहे.
हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाच्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन लाख ७७ हजार नॉइज बॅरिअर पॅनल्स यशस्वीपणे बसवण्यात आले आहेत. हे पॅनल्स एकूण १८८ किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलावर उभारले गेले आहेत. याशिवाय पुढील टप्प्यांसाठी पाच लाख ४२ हजार पॅनल्स आधीच तयार करण्यात आले असून, हे २७१ किलोमीटर लांबीच्या भागावर लावले जाणार आहेत. या पॅनल्समुळे बुलेट ट्रेनचा वेग आणि आवाज शेजारील शाळा, रुग्णालये, निवासी वसाहती यांच्यावर परिणाम होणार नाही. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी या प्रकारची तांत्रिक उपाययोजना देशात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
उच्च दर्जा आणि अचूक तंत्रज्ञानाचा वापर
या नॉईज बॅरिअर पॅनल्समध्ये विशेष प्रकारचं ध्वनिरोधक साहित्य वापरलं जात असून, ते वाऱ्याचा जोर, कंपन आणि विविध हवामानातील बदल सहन करण्यास सक्षम आहेत. यामध्ये आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने पॅनल्सची बसवणूक होते, जेणेकरून त्यांच्या अचूकतेत तडजोड होत नाही.
जागतिक दर्जाच्या निकषांवर आधारित बांधकाम
बुलेट ट्रेन प्रकल्प हा केवळ जलद प्रवासासाठी नाही, तर त्याच्या प्रत्येक टप्प्यातील बांधकाम हे जागतिक दर्जाच्या निकषांवर आधारित आहे. नॉईज बॅरिअर्ससारख्या उपाययोजनांमुळे हा प्रकल्प केवळ वेगवान नाही, तर पर्यावरणस्नेही आणि लोकाभिमुखदेखील ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.