मुंबई

पतीच्या मृत्यूनंतर मायलेकी रस्त्यावर

CD

पतीच्या मृत्यूनंतर मायलेकी रस्त्यावर
दोघीही सासरकडून बेदखल; रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : आपआपल्‍या पतीच्या निधनानंतर मायलेकींना सासरच्या मंडळींनी बेदखल केल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. मागील पाच वर्षांपासून ठाण्यात त्या भीक मागून जगत आहेत. मागील काही दिवसांपासून तलावपाळी रस्त्यावर एका बंद दुकानासमोर भरपावसात दोघीही अशक्त अवस्थेत आढळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

रजनी घाडीगावकर आणि तिची आई लक्ष्मी गावकर अशी बेघर मायलेकीची नावे आहेत. ७० वर्षीय लक्ष्मी यांचे पती अनंत हे ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. निवृत्तीनंतर काही वर्षांनी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यामुळे लक्ष्मी या मुलगी रजनी आणि जावयाकडे राहण्यास आल्या. पुढे रजनी यांच्या पतीचेही निधन झाले. रजनी आणि तिची आई लक्ष्मी या दोघी पाच वर्षांपासून रस्त्यावर राहात आहेत. लक्ष्मी यांचे पती अनंत घाडीगावकर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांचे निधन झाले, तर त्यांची मुलगी रजनी यांचे पती एका बँकेत कामाला होते. त्यांचेदेखील निधन झाले. त्यानंतर लक्ष्मी यांच्या दिरांनी आणि रजनी यांच्या सासरकडील मंडळींनी दोघींनाही घरातून हाकलून दिले. दोघींच्याही कुटुंबीयांनी त्यांना संपत्तीत कोणताही वाटा दिला नाही, तेव्हापासून त्या दोघी रस्त्यावरचे जगणे जगत आहेत. सुमारे पाच वर्षांपासून दोघीही ठाण्यात भीक मागून पोट भरत आहेत. रात्रीच्यावेळी रस्त्यावर आडोसा बघून एखाद्या दुकानाच्या ओट्यावर त्यांना झोपावे लागत आहे. त्यातच थंडी व पावसात भिजल्याने दोघीही आजारी पडल्या आहेत. या दोघींची अवस्था पाहून एका दक्ष नागरिकाने पुकार सेवा प्रतिष्ठानला या घटनेची हकीकत सांगितली असता प्रतिष्ठानच्या मदतीने त्या दोघींना (ता. ४) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


पेन्शनवर कसाबसा उदरनिर्वाह
लक्ष्मी यांनी सांगितल्यानुसार त्यांचे भाऊ, भाचे वकील असून, भांडुप येते राहतात; मात्र त्यांनीदेखील त्यांना आश्रय दिला नाही. पतीच्या मृत्यूनंतर लक्ष्मी यांना साडेतीन हजार रुपये पेन्शन मिळत असून, त्या पेन्शनवर त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होतो. या दोघी मायलेकींना अंघोळीकरिता सार्वजनिक शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. वर्तकनगर पोलिसांच्या मदतीने रजनी यांनी तिच्या दिरांकडे पतीच्या पैशाची मागणी केली; मात्र त्यांनी ते दिले नसल्याचे लक्ष्मी यांनी सांगितले. लक्ष्मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केरवडे गावच्या आहेत. सध्या या दोघींवरही ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, त्या बऱ्या झाल्यानंतर पुकार सेवा प्रतिष्ठानच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष हमराज जोशी यांनी सांगितले.


फोटो : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता प्रारंभी या दोघींना एकाच गादीवर झोपवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Killed Hamas Commanders : इस्रायली सैन्याने घेतला ७ ऑक्टोबरचा बदला; हमास दहशतवादी संघटनेच्या टॉपच्या पाच कमांडर्सचा केला खात्मा!

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

SCROLL FOR NEXT