तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन गतिमान
नऊ वर्षांमध्ये पनवेल महापालिकेचा विशेष भर
पनवेल, ता. १ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेला नऊ वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीमध्ये पालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विकास कामे प्रगतीपथावर आहे. तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने संकल्प सुद्धा महापालिकेने केला आहे. पालिकेचे एकूण वय आणि विकासाचा आलेख पाहता प्रशासनाने मोठा पल्ला गाठल्याचे दिसून येत आहे.
ऑक्टोबर २०१६ ला पनवेल महापालिकेची स्थापना झाली. सुरुवातीला कमी मनुष्यबळ असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्याच्यावर मात करत महापालिका प्रशासनाने आपला कारभार सुरू ठेवला. प्रशासनाने माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या पद्धतीने हायटेक मार्गांचा स्विकार केला. कर मित्र मोबाईल ॲप त्याचे एक उदाहरण आहे. त्याचबरोबर सात दिवस २४ तास तक्रार निवारण कॉल सेंटर उभारण्यात आले. तक्रारीसाठी ट्रॅकिंग व डॅशबोर्ड ची सुविधा निर्माण करण्यात आली.
मालमत्ता कराशी संबंधित सर्व सेवा एका क्लिकवर करण्यात आल्या.नागरिकांना जलद, पारदर्शक व प्रभावी सेवा वितरण करण्याच्या अनुषंगाने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांमध्ये प्रयत्न करण्यात आले.पनवेल महानगरपालिकेच्या दशकपूर्ती वर्षारंभानिमित्त विकासकामांचा नवा अध्याय सुरू होत आहे.या सर्व उपक्रमांमुळे पनवेल महापालिका नागरिकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत असून, दशकपूर्ती वर्षारंभ हा विकास व जनसहभागाचा ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले.
....................
प्रगतीपथावरील कामे :
स्वराज्य मुख्यालय इमारत व अंतर्गत सजावट
नवीन प्रभाग कार्यालये कळंबोली, खारघर, कामोठे
राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह
माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, अपना घर रात्र निवारा
.............
प्रस्तावित कामे :
कामोठे व तळोज्यात नवीन शाळा
नवीन दैनंदिन बाजारपेठा
खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेलमध्ये डायलिसिस सेंटर, नागरी आरोग्य केंद्रे, सामुदायिक सभागृहे, डेटा सेंटर व कमांड कंट्रोल सेंटर
.............
बांधकाम
जवळपास १५ किलोमीटर काँक्रिटीकरण!
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत १४.१७ किमी काँक्रीटीकरण पूर्ण
खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल परिसरात रस्ते सुधारणा व काँक्रीटीकरण प्रकल्प सुरू
...............
पाणीपुरवठ्यावर विशेष भर!
अमृत अभियान टप्पा-१ अंतर्गत ५ जलकुंभ, ३ टाक्या, ३८. ६० किमी जलवाहिनी व पंपिंग स्ट्रेशन कार्यान्वित करण्यात आली आहे. अमृत २. ० अंतर्गत २९ गावांतील पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजना प्रगतीपथावर आहे.
न्हावा-शेवा टप्पा-३ अंतर्गत प्रकल्पातून १०० द.ल.लि./दिवस पाणी आरक्षित करण्याचे नियोजन आहे.
शिलार नदी प्रकल्पातून ५०० द. ल. लि. पाणी पुरवठा, २०५७ पर्यंतची मागणी पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
................
वैद्यकीय आरोग्य विभाग
२६ आरोग्य केंद्रांत वाढीव वेळेपर्यंत सेवा
गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी व रक्तपुरवठा सुविधा
संशयित क्षयरोग व कॅन्सर तपासणीसाठी करारनामा
६२५ पेक्षा अधिक औषधे नागरिकांना उपलब्ध
४५० बेड्सचे हिरकणी माता व बाल रुग्णालय, ५२ ऑक्सिजन व ६ आयसीयु बेड्ससह संसर्गजन्म रोग रुग्णालय प्रस्तावित आहे. तसेच नवीन नागरी आरोग्स केंद्र व आरोग्सवर्धिनी उपकेंद्रे उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्डिओक रुग्णवाहिका व एक्सपोर्ट लॅब उभारण्यात येणार आहे.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.