मुंबई

परदेशगमनाची याचिका तेलतुंबडेंकडून मागे

CD

परदेशगमनाची याचिका तेलतुंबडेंकडून मागे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद  तेलतुंबडे  यांना व्याख्यानासाठी परदेश  प्रवासाला  परवानगी देण्यास  उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १) अनिच्छा व्यक्त केली. त्याची दखल घेऊन प्रा. तेलतुंबडे यांनी याचिका मागे घेतली.

तेलतुंबडे यांना परदेशात जाण्यास परवानगी मिळाल्यास ते फरारी होऊ शकतात. अशी भीती ‘एनआयए’ने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, याच कारणास्तव विशेष न्यायालयाने तेलतुंबडे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याची बाब न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजित भोसले यांच्या खंडपीठाने तेलतुंबडे यांच्या वकिलांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच प्रत्यक्ष जाण्याऐवजी व्हिसीमार्फत व्याख्यान घेण्याचा प्राध्यापकांनी विचार करावा, असेही न्यायालयाने सूचित केले आणि त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यावर याचिका मागे घेत असल्याचे तेलतुंबडे यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. कोरेगाव-भीमा येथे ३१ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ या दोन दिवशी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी प्रा. तेलतुंबडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. तेलतुंबडे प्रतिबंधित संघटना तसेच नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून बंदी घालण्यात आलेल्या संस्थांमध्ये लोकांची भरती करणे आणि निधी गोळा करण्याचे कामही करीत असल्याचा आरोप असून याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय प्रकरण?
अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाने चार आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी तेलतुंबडे यांची निवड केली आहे. त्या वेळी पीएच.डी. उमेदवारांसोबत चर्चासत्रांनाही ते उपस्थित राहतील, व्याख्याने देतील,  असेही याचिकेत म्हटले आहे. तेलतुंबडे यांना नेदरलँड्समधील लीडेन विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले आहे. शिवाय,  यूकेमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठानेही त्यांना स्कॉलर-इन-रेसिडेन्स म्हणून आमंत्रित केले आहे. याचिकेत ऑक्सफर्ड विद्यापीठासह यूकेमधील आणखी तीन विद्यापीठांनी निमंत्रण दिल्याचा उल्लेख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

SCROLL FOR NEXT