शाहरुख खान जगातील सर्वांत श्रीमंत अभिनेता
१२,४९० कोटींचा मालक
मुंबई, ता. १ : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या हुरून इंडिया रिच लिस्ट २०२५नुसार शाहरुखची संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे तब्बल १२,४९० कोटी रुपये इतकी आहे. या संपत्तीमुळे त्याने हॉलीवूड स्टार्स अरनॉल्ड, टॉम क्रूज, सेलेना गोमेज आणि टेलर स्विफ्टलाही मागे टाकले आहे.
हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४मध्ये शाहरुखची संपत्ती ७,३०० कोटी होती. अवघ्या एका वर्षातच त्याच्या संपत्तीत ५,००० कोटींची वाढ झाली आहे. चित्रपटांमधून मिळणारे मानधन, रेड चिली एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊस, जाहिरात करार तसेच पत्नी गौरी खानचा डी डेकोर व्यवसाय आणि मुलगा आर्यन खानचा लक्झरी कपड्यांचा ब्रँड डी’वयोल यामुळे त्याची कमाई प्रचंड वाढली आहे. शाहरुखपाठोपाठ जुही चावला आणि तिचा परिवार ७,७९० कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर ऋतिक रोशन २,१६० कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानी आहे. यंदाच्या यादीत दिग्दर्शक करण जोहर यांनी अमिताभ बच्चन यांना मागे टाकले आहे. हॉलीवूड स्टार्समध्ये अरनॉल्ड यांची नेटवर्थ १.२ अब्ज डॉलर होती; मात्र शाहरुख आता १.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीने त्याला मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने टॉम क्रूज (८९१ मिलियन) लाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे शाहरुखला त्यांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत नुकताच पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.