तळोज्यात भटक्या कुत्र्याचा पाच जणांवर हल्ला
दोन बालके गंभीर जखमी
पनवेल, ता. १३ (वार्ताहर) ः तळोजा गावात शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवत अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत पाच जणांवर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार लहान मुलांसह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून, यातील दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. या घटनेमुळे तळोजा गावातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तीनवर्षीय मुस्तफा नावाच्या मुलावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात मुस्तफाच्या ओठावर तसेच चेहऱ्यावर अनेक खोल जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पुनर्रचना शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. सातवर्षीय ईसा गुलबर हा त्याच्या घराजवळ असलेल्या मेडिकलमध्ये औषध खरेदीसाठी गेला असताना कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. ईसा गुलबर याच्यावर सध्या महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावरदेखील शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या भटक्या कुत्र्याने आणखी दोन मुले व एका व्यक्तीवरही अशाच पद्धतीने हल्ला केला आहे. त्यातून ते थोडक्यात बचावले असले तरी तेदेखील किरकोळ जखमी झाले आहेत.
...
कुत्र्याला पकडले
या घटनेनंतर स्थानिक काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नऊफिल सय्यद यांनी पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या भटक्या कुत्र्याच्या दहशतीबाबत माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने तातडीने कारवाई करीत या कुत्र्याला पकडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.