मुंबई

पान ३ पट्टा

CD

क्रीडा स्पर्धांच्या सरावाला सुरुवात
नवीन पनवेल (बातमीदार) ः पनवेलमधील विविध शाळांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर स्कूलने क्रीडा स्पर्धेच्या सरावाला सुरुवात केली आहे. डिसेंबरमध्ये वेगवेगळ्या क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा होत असतात. या स्पर्धामध्ये वैयक्तिक खेळापासून सांघिक खेळ शाळांमध्ये आनंदाचे वातावरण असते. विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी असे उपक्रम होत असतात. त्यामुळे पनवेलमधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका मानसी कोकीळ, मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोळाफेक, कुस्ती, धावणे, कबड्डी, खो-खोसारखे खेळ खेळवले जात आहेत.
़़़़ः-------------------------------------
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान
नेरूळ (बातमीदार) ः संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्याप्रमाणे जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील ४०५ सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे शौचालयाची दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या ५६० सफाईमित्रांचा कॅप, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, विजय पडघन यांनी सहभाग घेतला.
--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT