आरोग्य शिबिराचा १५७ नागरिकांना लाभ
नेरूळ (बातमीदार) ः वंचित बहुजन आघाडीचे बेलापूर तालुकाध्यक्ष ॲड. उमेश हातेकर यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर घेण्यात आले. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या सहकार्यातून झालेल्या शिबिरात नाक, कान, घसा, नेत्ररोग, बालरोग, हाडांचे, त्वचारोगतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. या शिबिरात औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विभागातील १५७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. वंचितचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, संतोष जाधव कार्याध्यक्ष, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, शरद सरवदे, महिला महासचिव साक्षी लोटे, उपाध्यक्ष नमिता भालेराव आदी उपस्थित होते.
़़़ः----------------------------
कामोठेतील वाचनालयाची अखेर दुरुस्ती
नवीन पनवेल (बातमीदार) ः कामोठे वसाहतीतील सेक्टर ११ येथे चार ते पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक वाचनालय बांधले होते; मात्र दुर्लक्षामुळे वाचनालय नादुरुस्त झाले होते. या वेळी स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती, त्यानुसार समाजसेवक सुरेश खरात, सचिन गायकवाड, माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालयाची दुरुस्ती सुरू केली आहे.