मुंबई

‘महाविस्तार-एआय’ अ‍ॅप ठरणार वरदान

CD

‘महाविस्तार-एआय’ अ‍ॅप ठरणार वरदान
स्मार्ट शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल; कृषी विभागाचा अभिनव उपक्रम
शहापूर, ता. २२ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त डिजिटल सुविधा आता उपलब्ध होत असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार–एआय’ हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अ‍ॅप सादर केले आहे. हवामानातील बदल, रोगराई, बाजारातील चढ-उतार आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती योग्य वेळी न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. ही दरी भरून काढण्यासाठी ‘महाविस्तार–एआय’ अ‍ॅप शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्येच तज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्य करणार आहे.
या अ‍ॅपमधील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी आपल्या पिकाचा फोटो मोबाईलवरून अपलोड करताच काही क्षणांत पिकावरील रोग, कीड किंवा पोषणद्रव्यांची कमतरता ओळखली जाते. त्यावर कोणते औषध फवारावे, कोणते खत द्यावे, किती प्रमाणात पाणी द्यावे याबाबत अचूक मार्गदर्शन या अ‍ॅपद्वारे मिळते. त्यामुळे अंदाजावर आधारित शेतीऐवजी शास्त्रीय पद्धतीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. यासोबतच या अ‍ॅपवर दररोजचा हवामान अंदाज, पावसाची शक्यता, तापमानातील बदल, वादळाचा इशारा अशा महत्त्वाच्या बाबींची माहिती वेळेवर उपलब्ध होणार आहे. बाजार समितीतील आजचे बाजारभाव, विविध पिकांचे दर तसेच शासनाच्या कृषी योजना, अनुदान योजना, पीक विमा, कर्ज योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहितीदेखील एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मेहनत आणि खर्च वाचण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
..............
पर्यावरणपूरक शेतीला चालना
‘महाविस्तार-एआय’ अ‍ॅपमुळे उत्पादन खर्चात बचत, योग्य खत व कीटकनाशकांचा संतुलित वापर आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील शेतीला डिजिटल पायाभूत सुविधा मिळाल्याने शेतकरी हळूहळू ‘स्मार्ट डिजिटल फार्मर’ बनत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर पूर्णपणे मोफत उपलब्ध असून, शेतकरी ‘Mahavistar AI’ किंवा ‘महाविस्तार एआय’ असे शोधून ते सहजपणे डाउनलोड करू शकता येते. कृषी विभागाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले असून, या डिजिटल उपक्रमामुळे भविष्यात शेती अधिक शाश्वत, फायदेशीर आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT