मुंबई

अकरा वर्षांच्या लढ्याला यश

CD

११ वर्षांच्या लढ्याला यश
अमेय गृहसंकुलाला भोगवटा प्रमाणपत्र मिळणार
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) ः नेरूळ येथील अमेय गृहसंकुलधारकांचा भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू असलेला ११ वर्षांच्या न्यायालयीन संघर्ष संपुष्टात आला आहे. उच्च न्यायालयाने वाढीव बांधकामासंदर्भाची जनहित याचिका फेटाळल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील अमेय सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पामबीच रेसिडेन्सी गृहप्रकल्प सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. या प्रकल्पात वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. नवी मुंबईतील पामबीच मार्गावर वाधवा बिल्डरच्या या बहुचर्चित संकुलात जवळपास तीन लाख चौरस फुटांहून अधिक वाढीव बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होता. त्यामुळे सोसायटीतील कोट्यवधींची घरे बेकायदा ठरवण्यात आली होती. शिवाय, घरे आणि दुकानांच्या विक्री व्यवहारावर महापालिकेने बंदी घातली होती.
----------------------------------
६६ कोटी भरले
या संकुलाला भोगवटा प्रमाणपत्र मिळावे, म्हणून येथील रहिवासी ११ वर्षे सरकारदरबारी झगडत होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात ४ मार्च २०२५ रोजी सुनावणीत न्यायालयाने ६६ कोटी रुपये संबंधित विकसक व सोसायटी यांना १४ मार्चपर्यंत भरण्याचे आदेश दिले होते. पैसे भरल्यानंतर संबंधित गृहसंकुलास जनहित याचिकेच्या निर्णयास अधिन राहून भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेला दिले होते.
--------------------------------
पालिकेला कारवाईची मुभा
जनहित याचिका फेटाळल्याचा अर्थ विकसकांनी किंवा महापालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याही बेकायदा कृत्याचे समर्थन मानू नये. तसेच, घर खरेदीदारांना होणाऱ्या त्रासाच्या जबाबदारीतून किंवा उत्तरदायित्त्वातून सुटण्याची परवानगी बेकायदा बांधकामांना जबाबदार व्यक्तींना दिली जाऊ शकत नाही. किंबहुना दोषी अधिकाऱ्यांविरोधात योग्य त्या कारवाईची मुभा पालिकेला असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष! प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा कसा असेल? यावर्षीची थीम काय? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन- "युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहे"

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनासाठी विद्यार्थ्यांना सहज बोलता येतील अशी भाषणं - एकाच क्लिकवर

Latest Marathi news Live Update : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुझफ्फरपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवणार

IND vs NZ 3rd T20I : 1st ball, 1st wicket! जसप्रीत बुमराहच्या भन्नाट चेंडूवर टीम सेइफर्टचा उडाला त्रिफळा, Video पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT