मुंबई

मेट्रोचे नव्या खांबांवरच पोस्टरबाजी सुरू

CD

मेट्रोच्या खांबांवर पोस्टरबाजी
डोंबिवलीचे विद्रूपीकरण, पालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन उघड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः कल्याण शीळ रोडवरील मेट्रो मार्गाचे काम झपाट्याने सुरू आहे. मात्र, नव्यानेच उभारलेले मेट्रोचे खांब राजकीय पोस्टरबाजीतून सुटू शकलेले नाहीत. खांबांचे काम पूर्ण होण्याआधीच राजकीय व्यक्तींनी यावर पोस्टर लावून शहराच्या सौंदर्याला ओरबाडण्यास सुरुवात केली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बॅनर, पोस्टर, फलक ही समस्या बराच काळापासून ठाण मांडून बसलेली आहे. शहरातील स्थानक परिसर, उड्डाणंपूलावरील विजेचे खांब, प्रमुख चौक, भिंती, सिग्नलजवळील खांब, उड्डाणपुलाखालील जागा याठिकाणी अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट असून, यामुळे शहर सातत्याने विद्रूप होत आहे. पालिका प्रशासनाकडून कारवाईचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात ती केवळ काही प्रभागापुरतीच सीमित राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाचे बॅनर, फलक मात्र जैसे थे असल्याचे चित्र वारंवार दिसते. विरोधी पक्षांच्या बॅनरवर तात्काळ कारवाई, तर सत्ताधाऱ्यांच्या पोस्टरकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती असल्याची नागरिकांनी टीका केली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोस्टरबाजी आणखी वाढली असून, शहरात नव्याने उभे राहिलेले मेट्रोचे खांब देखील या स्पर्धेतून सुटलेले नाहीत. काही जणांनी तर मेट्रो खांबांवरच मोठमोठी पोस्टर चिकटवले आहेत. यावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

कठोर कारवाईची मागणी
मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतरचे सौंदर्य आणि शहराचा चेहरा बदलण्याची अपेक्षा असतानाच, सुरुवातीपासूनच सुरू झालेली विद्रूपता पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. अनधिकृत पोस्टरबाजीवर पालिकेने ठोस, एकसमान आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी हे गरजेचे असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे, असा सूर स्थानिकांकडून उमटतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT