मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाने शिवसेनेला बळकटी

CD

वाडा, ता. २४ (बातमीदार) : काँग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्षा नयना चौधरी यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेससह ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे, मात्र या दोन्ही प्रवेशाने शिवसेना मजबूत झाली आहे.

दिलीप पाटील हे ३३ वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत असताना १२ वर्षे युवक काँग्रेस अध्यक्ष आणि १५ वर्षे तालुका कमिटी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या दोन जागा निवडून आणल्या होत्या. त्यांचा कुटूंब, मित्रपरिवार व नातेवाईक यांचा मोठा गोतावळा असून याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नयना चौधरी या मागील निवडणुकीनंतर काही काळ त्यांनी उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यांनाही मानणारा वर्ग वाडा शहरात मोठ्या प्रमाणात असून त्याचा फायदा या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा जोराचा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT