जोगेश्वरीत भव्य कोकण महोत्सव
जोगेश्वरी, ता. २५ (बातमीदार) ः भाजप कोकण विकास आघाडी, मुंबई आणि जोगेश्वरी लिंक रोड मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण महोत्सव २०२५चे भव्य आयोजन करण्यात आले. हा महोत्सव २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान शाम तलाव, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, गणेश मंदिराजवळ, जोगेश्वरी पूर्व येथे पार पडणार आहे. कोकणची कला, संस्कृती, खाद्य परंपरा, स्थानिक उत्पादने आणि लोककला यांचा संगम घडवणारा हा महोत्सव जोगेश्वरीकरांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. या महोत्सवासाठी मार्गदर्शक म्हणून सुहास आडिवरेकर आणि राजेंद्र कुडतरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महोत्सवाचे आयोजक ॲड. प्रिया लाड (परब) असून संयोजक सुप्रिया चव्हाण आणि ममता परब आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.