नवी मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली
सोमवारी नोव्हेंबरमधील सर्वाधिक खराब हवेची नोंद
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) ः मागील आठवड्यापासून तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. याचा फायदा घेत औद्योगिक वसाहतीमधून रात्रीच्या वेळी वायू प्रदूषण केले जात आहे. परिणामी, हवेची गुणवत्ता घसरली आहे. सोमवारी (ता. २४) रात्री नवी मुंबईतील हवा निर्देशांक २२२ इतका नोंदवला आहे. हा निर्देशांक नोव्हेंबर महिन्यातील उच्चांकी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मते आहे. तसेच हे आरोग्यास अतिहानिकारक आहे.
नवी मुंबई शहराच्या पूर्वला औद्योगिक क्षेत्र आहे. घणसोली, कोपरखैरणे विभाग हे औद्योगिक पट्ट्याला लागूनच आहेत. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यात होणाऱ्या प्रदूषणाचा फटका या विभागांना अधिक बसतो. सध्या वातावरणात गारवा वाढत आहे. त्याआडून कोपरी गाव, बोनकोडे, सेक्टर २६ या परीसरात मोठ्या प्रमाणात हवेत धूलिकण आढळत आहेत; मात्र हे धूलिकण नसून रसायनयुक्त वायू हवेत सोडल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांना मळमळणे व श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थेच आहे.
-
उग्र वासाने हैराण
सोमवारी रात्री नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक २२२ एक्यूआय, अती खराब दर्शवण्यात आली. ही गुणवत्ता नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक खराब हवा गुणवत्ता म्हणून नोंदीत झाली. शहरातील हवा गुणवत्ता ढासळल्याचे निदर्शनास येत आहे. एमआयडीसी क्षेत्राला लागून वसलेल्या रहिवासी क्षेत्रात रात्रीच्या वेळी हवेत अधिक प्रमाणात धूलिकण आढळत आहेत. त्याचबरोबर हवेबरोबर येणाऱ्या उग्र वासामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेताना अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-------------------------
नवी मुंबईतील हवेची सध्याची गुणवत्ता काय आहे?
पीएम २.५ मायक्रॉनअंतर्गत कण - ११७ µg/m³
पीएम १० मायक्रॉनअंतर्गत कण १४२ µg/m³
----------------------------
कोपरी गाव, सेक्टर २६, खैरणे आदी परिसरात होत असलेल्या वायू प्रदूषणाबाबत आम्ही प्रदूषण मंडळ, नवी मुंबई महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत; मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने वायू प्रदूषणाचे सत्र कायम आहे. यावर त्वरित तोडगा नाही काढला तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर सर्व रहिवासी मिळून आम्ही धडक देऊ.
- संकेत डोके, अध्यक्ष, नवी मुंबई प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.