विद्याभवनला संगीत साहित्य भेट
नेरूळ (बातमीदार) ः पुणे विद्यार्थीगृहाच्या नेरूळ शिक्षण संकुलासाठी सचिन गवळी, विद्याभवनच्या ज्येष्ठ शिक्षिका मीनल भोळे, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांच्या माध्यमातून देणगी स्वरूपात मदत देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वाद्यांचे सादरीकरण केले. सचिन गवळी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर मीनल भोळे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.