मुंबई

ठाण्यात १ डिसेंबरपासून २१ दिवसीय फिटनेस स्पर्धा..

CD

ठाण्यात १ डिसेंबरपासून २१ दिवसीय फिटनेस स्पर्धा
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन आणि डॉ. कुलकर्णी आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वजन कमी करण्यासाठी आयोजित २१ दिवसीय आव्हानात्मक स्पर्धेला फिटनेसप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही स्पर्धा १ ते २१ डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून नोंदणीची अंतिम तारीख रविवारी (ता. ३०) अशी जाहीर केली आहे.
हिवाळ्यात आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी आणि शारीरिक क्षमता तपासण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रत्येक स्पर्धकाची पूर्ण शरीर तपासणी मोफत केली जाणार आहे. सायकलिंगचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम नियमित सायकलिंगमुळे हृदयाची क्षमता वाढते, तणाव कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. वाढत्या प्रदूषण आणि बसून राहण्याच्या सवयींमुळे आरोग्य धोक्यात आलं आहे. अशा परिस्थितीत सायकलिंग हा उत्तम पर्याय ठरतो, असे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ञ डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगितले. प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी व भेटवस्तू देण्यात येणार असून सर्व सहभागींसाठी पदकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नियम व अटी
ही स्पर्धा ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई व नवी मुंबई येथील १८ वर्षांवरील नागरिकांसाठी खुली आहे. जिम किंवा इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार नाही. आरोग्य तपासणी डॉ. कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म केंद्रात करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ८५९१४ ९४१४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT