मुंबई

तिघा मित्रांकडून तरुणासह आईला मारहाण

CD

भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) : चेष्टा-मस्करी करताना झालेल्या गैरसमजातून तीन मित्रांनी संगनमताने शेजारच्या तरुणाला बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना न्यू आझादनगर परिसरात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात तिघा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल, नबिल्ला आणि सद्दाम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर जखमी तरुणाचे नाव सलमान युसूफ अन्सारी (१८) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान हा मजुरीचे काम करतो आणि कुटुंबासह न्यू आझादनगर पाईपलाइन बावडीजवळ राहतो. आरोपी तिघेही त्याच परिसरातील आहेत. २४ नोव्हेंबरला सकाळी सलमान मित्रासोबत कामावर जात असताना ते एकमेकांशी चेष्टा-मस्करी करत होते. त्या वेळी ते आपलीच चेष्टा करीत आहेत, असा गैरसमज नबिल्ला याला झाला. रात्रीच्या सुमारास हा राग मनात ठेवून नबिल्ला, साहिल आणि सद्दाम तिघेही सलमानजवळ आले. त्याचा जाब विचारत त्यांनी हल्ला केला. यामध्ये साहिलने दुचाकीच्या शॉकॲब्झॉर्बरच्या सराने सलमानच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी सलमानची आई पुढे आली असता तिघांनी त्यांच्यावरही मारहाण करत शिवीगाळ केली. या संपूर्ण घटनेनंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT