दत्तजयंती उत्सव सोहळा
मुंबई, ता. २७ ः श्री दत्तजयंती उत्सव मंडळ, समतानगर केतकी पाडा, दहिसर या मंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. ४) श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने श्री सत्यनारायण पूजा आणि भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. रात्री करमणूक कार्यक्रम, लहान मुलांचे संगीत नृत्य असे कार्यक्रम होणार आहेत. मंडळाला ३६ वर्षे पूर्ण झाल्याबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. ३०) महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संपर्कप्रमुख रसिक शिरधनकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.