सेंट्रल पार्कचे नामकरण ‘संविधान सेंट्रल पार्क’ करण्याची मागणी
खारघर, ता. २७ (बातमीदार) : खारघर येथील प्रसिद्ध सेंट्रल पार्कचे नाव बदलून ‘संविधान सेंट्रल पार्क’ असे करण्यात यावे, अशी मागणी संविधान सन्मान महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, या मागणीला नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर खारघरमध्ये संविधान सन्मान महोत्सव समितीच्या पुढाकाराने भव्य ‘संविधान सन्मान रॅली’ तसेच संविधान साक्षरता सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात खारघर परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, तरुण-तरुणी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधानाबाबत जनजागृती व्हावी, नागरिकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ही रॅली सेंट्रल पार्क येथे विसर्जित झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी एकमुखी ठराव मंजूर करून सेंट्रल पार्कचे नामकरण ‘संविधान सेंट्रल पार्क’ असे करण्यात यावे, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला. या ठरावाची अंमलबजावणी करत, सिडको प्रशासनाकडे तो अधिकृतपणे पाठविण्यात आला आहे. या रॅलीचे नेतृत्व संविधान सन्मान महोत्सव समितीचे संयोजक अमरचंद हाडोळतीकर यांनी केले. कार्यक्रमाला सुशील महाडिक, तुकाराम कांबळे, डॉ. प्रीती शर्मा, डॉ. निधी अग्रवाल, ॲड. राजरत्न डोंगरगावकर, हर्ष कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.