एसी लोकलचा बनावट पास बनविणाऱ्या दांम्पत्याला अटक
कल्याण, ता. २८ : आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनविण्याचा प्रयत्न एका उच्चशिक्षित दाम्पत्याला चांगलाच महागात पडला आहे. तंत्रज्ञानाचच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या अंबरनाथमधील पती-पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण स्थानकातील एसी लोकलमधील तपासणीदरम्यान हि घटना समोर आली. एका महिला प्रवाशाला तिकीट तपासणीदरम्यान विशाल नवले नामक टीसीने पास दाखविण्यास सांगितले. तिने रेल्वेच्या यूटीएस ॲपमधील स्क्रीन दाखवली, मात्र तो पास संशयास्पद वाटल्याने टीसीने तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून त्या पासची पडताळणी केली. तपासात धक्कादायक बाब समोर आली पास ओम शर्मा या व्यक्तीचा असून, तो जानेवारी महिन्यात जारी केलेला आणि फेब्रुवारीमध्येच कालबाह्य झालेला होता. महिलेने स्वतःचे नाव गुडिया शर्मा असल्याचे सांगितल्याने टीसीचा संशय अधिक गडद झाला.
डोंबिवली स्थानकात तिला उतरवून आरपीएफ कार्यालयात चौकशी करण्यात आली. तेव्हा खरा खुलासा झाला तिच्या पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एडिट करून त्यावर पत्नीचे नाव व तपशील टाकत बनावट पास तयार केल्याचे मान्य केले. दोघांवर रेल्वे पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.