आरसीएफ ट्रॉम्बे येथे संविधान दिन उत्साहात
चेंबूर, ता. २९ : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ), ट्रॉम्बे युनिटमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनाचे) वाचन करून कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी संचालक सुश्री ऋतु गोस्वामी यांनी प्रियदर्शिनी बिल्डिंग येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पठन केले. तसेच कार्यकारी संचालक (ट्रॉम्बे) विक्रम जावळे यांनी प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पठण केले. कार्यक्रमाला ट्रॉम्बे युनिटमधील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि आरसीएफमधील यूनियन्स व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व, इतिहास, भारतीय लोकशाहीची पायाभरणी, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर आधारित व्याख्यान जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे येथील राज्यशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्वेता अहिरे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.