हरकती व सूचना ३ डिसेंबरपर्यंत स्वीकारणार
भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सुधारित मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार हरकती व सूचना मागविण्याच्या तारखेस मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नागरिकांच्या हरकती व सूचना महापालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी ३ डिसेंबरपर्यंत स्वीकारणार आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त हरकतींबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना पालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपयुक्त (निवडणूक) यांच्यामार्फत भिवंडी मनपात मार्गदर्शन सत्र राबविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.