मुंबई

भिवंडीतील यंत्रमाग कामगार गोदामाकडे

CD

‘भिस्सी’ (खाणावळ) व्यवसायावर मोठे संकट
भिवंडीतील यंत्रमाग कामगार गोदामांकडे; खाणावळीच्या खर्चात वाढ
भिवंडी, ता. २ (बातमीदार) : भिवंडीची ओळख असलेल्या यंत्रमाग उद्योगातील कामगार सततची मंदी आणि कामाच्या ताणामुळे गेल्या काही वर्षांपासून गोदामांमध्ये रोजगारासाठी वळू लागले आहेत. याचा परिणाम केवळ यंत्रमाग मालकांवरच नव्हे, तर वर्षानुवर्षे उत्तर भारतीय कामगारांना दोन वेळचे जेवण पुरवणाऱ्या ‘भिस्सी’ (खाणावळ) चालकांवरही झाला आहे.
भिवंडीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मोठ्या संख्येने कामगार यंत्रमाग उद्योगात येत होते; मात्र पॉवरलूम उद्योग मंदीतून जात असल्याने आणि आधुनिक यंत्रमाग न स्वीकारल्याने, यंत्रमाग मालकांनी एकाच कामगाराला आठ ते १० यंत्रमाग चालवण्यास भाग पाडले. सततच्या कामाचा ताण, थकवणारे काम आणि उत्पन्न अस्थिर असल्याने, अनिवासी कामगारांना यंत्रमाग कारखान्याऐवजी गोदामांमध्ये काम करणे अधिक सोयीचे वाटू लागले आहे. या बदलामुळे खाणावळींमध्ये जेवणारे कामगार ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत, ज्यामुळे भिस्सी मालकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
२०२२ मध्ये १५ दिवसांच्या जेवणाचा खर्च प्रति व्यक्ती एक हजार होता, तो आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे १,२०० रुपयांपर्यंत वाढला आहे.
भिस्सी व्यवसाय पूर्णपणे उधारीवर चालतो. कामगार पैसे न देता गावी निघून जातात किंवा गोदामात नोकरीला लागतात. त्यामुळे खाणावळ मालकांचा आर्थिक भार वाढतो. शहरात अनेक हॉटेल मालकांनी कमी किमतीची थाळी सुरू केल्याने कामगार तिकडे वळले आहेत.

अनिश्चित भविष्य
भिस्सी मालकांची भेट घेऊन माहिती घेतली असता त्यांनी सांगितले, की व्यवसायातील अनिश्चिततेमुळे आम्ही सध्या चिंतातुर आहोत. नोटाबंदी, जीएसटी, वीजदर वाढ आणि कोविड-१९ लॉकडाऊनचा फटका बसलेल्या या व्यवसायातील कामगार पुन्हा यंत्रमाग उद्योगात येण्याची शाश्वतीही वाटत नाही. नसल्याने भिस्सी चालकांचे भविष्य अनिश्चित बनले आहे. गोदामात कामगार गेल्याने यंत्रमाग कारखान्यातील कामगार कमी झाले आहेत. परिणामी भिस्सीमध्ये जेवणारेदेखील कमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT