मुंबई

आठ जबरी चोरीचे गुन्हे उघड

CD

आठ जबरी चोरीचे गुन्हे उघड
लोहमार्ग पोलिसांची कामगिरी; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ :  कोकण रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी मेल व एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व पर्स चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा, नेरूळ युनिट - ५ आणि नव्याने स्थापन झालेल्या रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या पथकाने जामखेड (जि. अहिल्यानगर) येथून एका आरोपीला अटक करून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपीकडून ४२ ग्रॅम वजनाचे सुमारे पाच लाख दोन हजार रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापे-वामने ते दिवाण खवटी रेल्वेस्थानकांदरम्यान रात्रीच्या वेळेस आउटर सिग्नलला थांबणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चोरीचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर तपास सुरू असतानाच गुन्हे जामखेड परिसरातील टोळी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या सूचनेनुसार तीन विशेष पथके तयार करण्यात आली. सलग तीन दिवस सापळा रचून विनोद सखाराम जाधव (रा. जामखेड) याला अटक करण्यात आली. त्याच्यावर रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासात आरोपी विनोद जाधव याच्यासह मारुती झरे (रा. आष्टी, जि. बीड), सोनू काळे व लाला पवार (दोघे रा. जामखेड) अशी चार जणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले. ही टोळी सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या मार्गांचा वापर करायची. रेल्वे स्थानकांपासून थोड्या अंतरावर कार उभी करून झुडपात लपून बसायची. रेल्वे ॲपवरून कोणती गाडी थांबणार आहे याची माहिती घेऊन, अंधाराचा फायदा घेत गाडीच्या उघड्या खिडकीतून हात घालून चोरी करायची, अशी त्यांची पद्धत होती.

सोन्याचे दागिने वितळवून लगडी तयार
पोलिस कोठडीत तपासादरम्यान आरोपीने चोरीचे सोन्याचे दागिने वितळवून सोन्याच्या लगड तयार केल्याची कबुली दिली. त्यानुसार पाच गुन्ह्यांतील सोन्याच्या लगड तसेच इतर तीन गुन्ह्यांतील पर्स, आधार कार्ड, पॅन कार्ड असा माल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी रात्री मेल व एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना सीटजवळील सर्व खिडक्या बंद ठेवाव्यात आणि मौल्यवान वस्तू सुरक्षितरीत्या जवळ ठेवाव्यात, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून  करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT