मुंबई

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजेंनी साताऱ्यात रोवली शिक्षणाची मुहूर्तमेढ

CD

प्रतापसिंह राजेंनी रोवली शैक्षणिक मुहूर्तमेढ
साताऱ्यात शाळांसह ग्रंथालय, छापखान्याची उभारणी
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः साताऱ्यात गुरुवारपासून (ता. १) ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा नगरीचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे (१८०८-१८३९) यांनी शहराच्या विकासासाठी केलेले कार्य वाखागण्याजोगे आहे. साताऱ्यातील विविध विकासकामांसोबतच त्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये केवळ मराठी, इंग्रजीच नव्हे, तर परकीय भाषाही शिकवण्याबाबत पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर अर्ल ऑफ क्लेअर यांनी गौरव केला.
एकीकडे महात्मा फुले यांची शैक्षणिक चळवळ सुरू असताना त्याचदरम्यान प्रतापसिंह राजे यांनी साताऱ्यातही शाळा सुरू केल्या. अनेक ऐतिहासिक नोंदीत छत्रपती प्रतापसिंहांनी शिक्षणासाठी तरुणांना प्रोत्साहित केल्याचे नमूद केले आहे. आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी मुंबई येथील डॉ. मिल्न यांच्यामार्फत दोन-तीन विद्वान मिशनरींच्या माध्यमातून पाठशाळेचा उपक्रम राबवला. महिला आणि दलितांच्या शिक्षणाविषयी त्यांनी पुढाकार घेतल्याने अनेकांनी त्यास विरोध केला; मात्र त्यास न जुमानता शैक्षणिक चळवळ प्रभावीपणे सुरू ठेवली. इंग्रजीतील अनेक मूल्यवान ग्रंथांचे मराठीत भाषांतर करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
----
सैनिकी शिक्षणास प्रोत्साहन
आपल्या शाळांतील मुला-मुलींनी सैनिकी शिक्षण घ्यावे, यासाठी प्रतापसिंह राजे आग्रही होते. त्यासाठी ग्रँट डफच्या सल्ल्यानुसार एका इंग्रज अधिकाऱ्याची नियुक्ती केली. स्वतःची कन्या गोजराबाई आणि इतर सरदारांच्या मुलींना सैनिकी शिक्षण देऊन आदर्श घालून दिला. मुलींना अश्वारोहण, भालाफेक, बंदुकीच्या नेमबाजीसाठी प्रोत्साहन दिले.
--
ग्रंथप्रेमी राजा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे ग्रंथप्रेमी होते. त्यांनी १८२६च्या सुमारात पाठशाळेच्या इमारतीत एक छापखानाही काढला होता. विविध ग्रंथ त्या ठिकाणी छापून ते स्थानिक लोकांसाठी उपलब्ध करून दिले होते. ‘सभारंजनी’, ‘सभानीति’, ‘आय-व्यय प्रकरण’, ‘सेवक-बोधिनी’ इत्यादी ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. इतकेच नव्हे तर अनेक नामवंत लेखकांना ग्रंथलेखनासाठी प्रोत्साहन दिल्याचे दाखले आहेत.
--
स्वत:चे पहिले ग्रंथालय
ग्रंथप्रेमी राजाने विविध भाषांतील ग्रंथसंपदा संग्रही ठेवली होती. त्यांनी स्वतःचे ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ नामक ग्रंथालय सुरू केले. पुढे १८४९मध्ये श्रीमंत आप्पासाहेबांच्या पत्नी राणी सगुणाबाई यांनी ते जनतेच्या स्वाधीन केले. १८५२मध्ये सातऱ्यात ‘सातारा सिटी लायब्ररी’ आणि ‘सातारा स्टेशन लायब्ररी’ अशी दोन ग्रंथालये होती. १८६६मध्ये या दोन्ही ग्रंथालयांचे विलीनीकरण होऊन ‘सिटी जनरल लायब्ररी’ म्हणून नावारूपास आले. १९०५ मध्ये वाचनालयाची नवीन इमारत झाल्यावर त्याचे नाव ‘व्हिक्टोरिया लायब्ररी’ ठेवण्यात आले. १९३८च्या डिसेंबरमध्ये त्याचे नाव बदलून ते ‘नगर वाचनालय’ करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Alcohol Tree : ऐकू ते नवलच! 'या' 3 झाडांपासून बनते दारू...लाखो लोकांना आजही नाही माहिती

INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT