मुंबई

चिखलातून धोकादायक प्रवास

CD

चिखलातून धोकादायक प्रवास
चारकोपला जाणाऱ्या मार्गावर वाहनचालकांची कसरत

कांदिवली, ता. १ (बातमीदार) : कांदिवली पश्चिमेला म्हाडा वसाहतीमधील चारकोपकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण सुरू आहे. सिग्नल चौकालगत एक बाजू पूर्ण होत असून, दुसरी बाजू वाहतुकीस खुली आहे. मात्र या वाहतुकीच्या मार्गावर असमांतर रस्ता आणि एक ते दीड फूट चिखल-मातीचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. पालिकेने वाहतुकीसाठी खुला असलेल्या अर्ध्या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांमधून केली जात आहे.
न्यू लिंक रोडवर असलेल्या म्हाडा वसाहतीमधून श्याम सत्संग मार्ग चारकोपकडे जातो. या मार्गावर एकतानगर, ब्ल्यू एम्पायर, गौरव गार्डन आणि चारकोपमधील प्रवासी आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या वर्षापासून या मार्गाचे काँक्रीटीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. १२ मीटर रुंदीच्या मार्गाच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण होत आहे. उर्वरित अर्ध्या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने सातत्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यातच सिग्नल चौकाच्या बाजूला जेथून मार्गाची सुरुवात होते, त्या खुल्या असलेल्या अर्ध्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. सुरुवातीलाच खड्डे, उंच-सखलपणा आणि चिखल मातीचे एक ते दीड फुटाचे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले आहेत. दुचाकीस्वारांना या मार्गावरून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बरेचदा चिखलात चाके रुतत असल्याने वाहनचालकांची दमछाक होते. चारचाकी वाहनांनाही सावधपणे वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
दरम्यान, रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता उदय कांगी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.


मुख्य मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. संबंधित विभागाने वाहतुकीस खुला असलेला अर्धा मार्ग खड्डेमुक्त व चिखलमुक्त करावा.
- भूपेश कदम, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT