मुंबई

पीएम किसान लाभार्थ्यांची फेरतपासणी

CD

शहापूर, ता. ५ (वार्ताहर) : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शासकीय नोकरदार, करदाते, १८ वर्षांखालील; तसेच एका घरातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू केली होती. आता याच धर्तीवर केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याची मोहीम शहापूर तालुक्यात हाती घेण्यात आली आहे. या नव्या निकषांमुळे शेकडो लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार योजनेतील संशयित लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात येत आहे. एका घरात अनेक लाभार्थी असणे, सरकारला आयकर भरणारे शेतकरी, शासकीय किंवा खासगी नोकरी करणारे लाभार्थी यांना या तपासणीत अपात्र ठरवले जाणार आहे. तसेच २०व्या हप्त्यानंतर डिजिटल पद्धतीने पडताळणी प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. नोव्हेंबर २०२५पर्यंत २१ हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र, या टप्प्यानंतर केंद्र सरकारने योजनेसाठी नवे निकष लागू केले आहेत. केवायसी न केलेले, एका कुटुंबात अनेक लाभार्थी असलेले, नोकरी करणारे व करदाते अशा लाभार्थ्यांना २०व्या हप्त्यानंतर लाभ देणे थांबवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहापूर तालुक्यात लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू आहे. अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आपले नाव योजनेत कायम राहणार की नाही, याबाबत संभ्रमात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : लातूराच्या रेणापूर, अहमदपूर भागात अवकाळी पाऊस, रब्बी पिकांना फटका

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT