मुंबई, ता. १० : स्वारगेट ते दादर शिवनेरी बसमधून प्रवास करताना प्रमिक्षा कोळपे यांच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने शनिवारी (ता.१०) सायंकाळी हरवले. प्रमिक्षा यांना घरी आल्यावर दागिने हरवल्याचे समजले; त्यानंतर त्यांनी याबाबत एसटी महामंडळात चौकशी केली. दादर स्थानक प्रमुख संतोष शिंदे आणि वाहनमित्र भरत जाधव यांनी शिवनेरी व्यवस्थापनाशी संपर्क साधत परळ आगारात बस तपासणी केली असता हे दागिने सापडले.