मुंबई

उज्ज्वलांना पुन्हा चुलीचा आधार

CD

उज्ज्वलांना पुन्हा चुलीचा आधार
गॅस सिलिंडर परवडेनासा; ग्रामीण भागात लाकूडफाटा जमवण्याची धावपळ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना चुलीतील धुरापासून मुक्ती मिळावी, महिलांचे आरोग्य सुधारावे आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागावा, या उद्देशाने केंद्र सरकारने २०१६ मध्ये ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना’ सुरू केली होती. या योजनेमुळे ग्रामीण व दुर्गम भागात स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढला. काही वर्षांपूर्वी तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजनाही राबवण्यात आली होती. मात्र सध्या या सवलती बंद झाल्याने आणि घरगुती गॅसच्या किमती सातत्याने वाढत असल्याने उज्ज्वला लाभार्थ्यांना पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये गॅस शेगडी व सिलिंडर उपलब्ध असले तरी रिफिलिंगचा खर्च परवडत नसल्याने सिलिंडर रिकामेच पडून आहेत. परिणामी महिलांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. त्‍यामुळे लाकूडफाटा जमवण्यासाठी गावोगावी महिलांची भल्या पहाटे जंगलात धावपळ सुरू आहे. हा लाकूडफाटा सरपण म्हणून साठवून ठेवला जात असून त्यामुळे वनसंपदेवरही ताण येत आहे. वृक्षतोड कमी व्हावी, इंधनासाठी जंगलांवरील अवलंबित्व घटावे आणि महिलांना धुरामुळे होणाऱ्या श्वसनविकारांपासून संरक्षण मिळावे, या हेतूने उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रारंभी कोणतेही शुल्क न आकारता गॅस शेगडी व सिलिंडर वितरित करण्यात आले. मात्र त्यानंतर प्रत्येक रिफिलिंगसाठी बाजारभावानुसार पैसे भरावे लागल्याने गरीब कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढला. महागाईच्या झळांमुळे अनेक महिलांनी गॅसचा वापर मर्यादित केला असून चुलीवरच स्वयंपाक करणे त्यांना भाग पडत आहे. तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होत आहे. त्यामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी पुन्हा सवलती, अनुदान किंवा मोफत/अल्पदरातील सिलिंडर योजना सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.
...............
६३ हजार ७८४ गॅस जोडणी
रायगड जिल्हा उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात राज्यात अव्वल ठरला होता. कमी कागदपत्रांत मोफत शेगडी व गॅस सिलिंडर मिळत असल्याने पहिल्या दोन वर्षांत मागणीत मोठी वाढ झाली. प्रत्येक गृहिणीला घरात गॅस कनेक्शन असावे, या अपेक्षेतून जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ७८४ उज्ज्वला गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत.
..............
सुपारी- नारळाच्या बागेची साफसफाई करण्याचे काम मी मजूरीवर करते. दिवसभर काम करताना लाकुडफाटा जमा होतो, तो त्याच ठिकाणी न जाळता त्याची मोळी करून घरात आणते. मोल मजुरी करणाऱ्यांना गॅस सिलिंडरची रिफिलिंग परवडत नसल्याने हा बीनखर्चाचा मार्ग सोयीचा वाटतो.
-कविता पाटील, गृहिणी, अलिबाग
-------
उज्जला योजनेंतर्गत गॅस जोडण्या
अलिबाग - ५०७८
कर्जत - १०४६०
खालापूर -८६२८
महाड - ६१५३
माणगाव - ३४७५
म्हसळा - ४५२१
मुरुड - ११६१
सुधागड - १९१५
पनवेल - ३९४७
पेण- १०२९३
पोलादपुर - ७८७
रोहा- ५४९८
श्रीवर्धन-४७३६
तळा-१३८५
उरण - १८४४
एकूण - ६९८८१
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : "कमिशनखोरी अन् उन्माद खपवून घेणार नाही"; फडणवीसांचा पुण्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कडक इशारा!

Horoscope : माघ महिना सुरू होताच 5 राशींचे भाग्य बदलणार; होणार धनलाभ, खूप वर्षांपासूनची इच्छा होईल पूर्ण, नोकरी-धंद्यात मिळेल मोठे यश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT