मुंबई

भुईभाडे वसुलीसाठी म्हाडाची मोहीम

CD

भुईभाडे वसुलीसाठी म्हाडाची मोहीम

कोकण मंडळांतर्गत प्रक्रिया होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाच्या कोकण मंडळांतर्गत असलेल्या वसाहतींचे, भूखंडाचे भुईभाडे आणि सेवा शुल्क वसूल करण्यासाठी म्हाडा आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीस पाठवल्या असून, देय असलेल्या सुमारे २५ कोटी रुपये रकमेच्या वसुलीसाठी सोमवारपासून (ता. १९) ते ३ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार संबंधित भाडे वसुलीकार आणि गट लिपिकांना प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागणार आहे.

ठाणे, कल्याण, मिरा रोड, भिवंडी, कर्जत, पेण, वसई, विरार या परिसरात भुईभाडे वसुलीची प्रक्रिया सुरू होणार असून, त्याचा दैनंदिन अहवाल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे म्हाडाचा रखडलेला महसूल वसूल होऊ शकणार आहे. म्हाडाकडून आपल्या भूखंडावर इमारती उभारून त्यामध्ये तयार होणाऱ्या घरांची लाॅटरीच्या माध्यमातून विक्री केली जाते. तसेच, अनेक भूखंड भाडेतत्त्वावर दिले जातात. त्यामुळे संबंधितांनी म्हाडाकडे भुईभाडे आणि सेवा शुल्काचा भरणा करणे अपेक्षित आहे; मात्र त्याची वसुली होत नसल्याने सुमारे २५ कोटी रुपयांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे. त्याची दखल घेत कोकण मंडळाचे मुख्य आधिकारी डाॅ. विशाल राठेड यांच्या निर्देशानुसार, वसुलीची मोहीम सुरू केली जाणार आहे.
--------
म्हाडाच्या जागेवर उभ्या राहिलेल्या इमारतींच्या बदल्यात संबंधित संस्थेने नियमित भुईभाडे भरणे बंधनकारक असतानाही अनेक सोसायट्या गंभीर नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत आहे. त्यामुळे विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे.
- डाॅ. विशाल राठोड, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ (म्हाडा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT