मुंबई

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; मोहोळजवळ भीषण अपघातात पाच ठार,

CD

कार अपघातात पाच ठार; एक महिला जखमी
देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला
पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : पनवेल येथून अक्कलकोट येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी परिसरात शनिवारी (ता. १७) रात्री झालेल्या भीषण अपघातात कारमधील चालकासह पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत बचावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत झालेल्यांमध्ये अर्चना तुकाराम भंडारे (वय ४७), माला रवि साळवे (४०), विशाल नरेंद्र भोसले (४१), अमर पाटील (३७) आणि आनंद माळी (४०) यांचा मृत्यू झाला. सर्व मृत पनवेल व खारघर परिसरात राहण्यास होते. या अपघातात जखमी झालेल्या ज्योती जयदास टकले (४२) यांच्यावर मोहोळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृत व जखमी हे सर्वजण शनिवारी सायंकाळी पनवेल येथून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची कार मोहोळ येथील देवडी पाटी येथे येथे आली असताना, कारचालक अमर पाटील यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची कार रस्त्याच्या खाली जाऊन झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. देवदर्शनासाठी आनंदाने निघालेला प्रवास क्षणार्धात मृत्यूच्या दाढेत गेल्याने पनवेल परिसरात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT