मुंबई

भाजपचे सत्तास्वप्न भंगले

CD

भाजपचे सत्तास्वप्न भंगले
उल्हासनगरात वंचितच्या साथीने शिवसेनेचा महापौर
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेतील सत्तासंघर्षाला अखेर निर्णायक कलाटणी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी रविवारी मध्यरात्री शिवसेनेला (शिंदे गट) पाठिंबा जाहीर केल्याने महापालिकेत शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.

७८ सदस्यीय उल्हासनगर महापालिकेत बहुमतासाठी ४० जागांची आवश्यकता होती. निकालानंतर कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते, मात्र नव्या समीकरणामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) ३६ (स्वतःच्या जागा) अधिक वंचितच्या दोन जागा, एक अपक्ष आणि साई पक्षाचा एक नगरसेवक अशा ४० जागांच्या बहुमताच्या जोरावर शिवसेनाचा महापौर बसणार आहे, तर भाजपला सर्वाधिक ३७ जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा सोनावणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. प्रभागाचा विकास आणि दलित वस्ती सुधार योजनेसाठी हा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.

शिवसेनेची ‘सेफ’ गेम
फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी शिवसेनेने खबरदारी म्हणून आपल्या समर्थक नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची चर्चा आहे. अपक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांच्या आधीच्या पाठिंब्यानंतर आता शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT