मुंबई

बाळासाहेबांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने शिदोरी वाटप..

CD

बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे शिदोरी वाटप
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंती तसेच जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना विभाग क्रमांक दोनअंतर्गत शाखा क्रमांक २२च्या वतीने गरजू महिलांना शिदोरी (धान्य व जीवनावश्यक वस्तू) वाटप करण्यात आले.
शाखाप्रमुख गणेश पवार यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. २३) हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात विभागातील गरजू व निराधार अशा एकूण ९९ महिलांना दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना शाखा क्रमांक २२च्या पदाधिकारी संगीता आचरेकर (विधानसभा समन्वयक), शाखाप्रमुख गणेश चंद्रकांत पवार, कार्यालयप्रमुख संजय संगारे, अरुणा कदम, शाखा समन्वयक बालाजी कालप, चैताली शेडगे, उपशाखाप्रमुख सुनील भोईर, तेजस आंबोळकर, हरेश पटेल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT