मुंबई

संत, महापुरुषांवर निबंध स्पर्धा

CD

संत, महापुरुषांवर निबंध स्पर्धा

धारावी, ता. १ (बातमीदार) : राष्ट्रीय संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती महोत्सवनिमित्त तसेच संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे माध्यमिक शाळांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संत व महामानव यांच्या विचारावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत आपले निबंध शाळेच्या मुख्याध्यापकांकडे द्यायचे आहेत.
विभागातील शाळांध्ये संघामार्फत पत्रक पोहोचविण्यात येत आहेत. संघातर्फे धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर शाळा, युनिव्हर्सल रात्र शाळा, सायनमधील डी. एस. हायस्कूल, साधना विद्यालय यांना त्याचे निवेदन पत्र देण्यात आले आहेत. माटुंगा, कुर्ला, माहीम, धारावी या भागांतील शाळेला सहभागी करून घेतले जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेश अध्यक्ष रामभाऊ कदम, मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर, सचिव गणेश खिल्लारे, माजी मुख्याध्यापक पोटे आणि धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर यांच्या अधिपत्याखाली होत आहे. या कामी संपर्कप्रमुख शंकर खिल्लारे, समन्वयक शंकर बळी कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT