रानवली येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) : रानवली येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना संत रोहिदास महाराजांच्या विचारांची महती सांगितली. समाजात समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणारे, त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास रानवलीचे सरपंच सुरेश मांडवकर, समाजसेवक राजू जाधव, प्रमोद पवार, अभय चव्हाण, राजमुद्रा ग्रुपचे सदस्य केतन अडखले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंतीचे आयोजन हरिजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांनुसार समाजसेवा व सामाजिक ऐक्य जपण्याचा संकल्प केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.