मुंबई

मराठी मोर्चाच्या आयोजकांना पोलिसांकडून नोटीस

CD

मराठी मोर्चाच्या आयोजकांना पोलिसांकडून नोटीस
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपकडून मराठी उमेदवार देण्यात आलेला नाही, याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. ३) मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, आयोजकांना मनाई आदेशाची नोटीस बजावण्यात आली आहे.
‘मिरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा’ अशी ठाम भूमिका मराठी एकीकरण समिती आणि मनसेने घेतली आहे. भाजपने माजी महापौर डिंपल मेहता यांना उमेदवारी दिली असून, विरोधकांकडून काँग्रेसच्या रुबिना शेख रिंगणात आहेत. मंगळवारी महापौरपदाची निवड होणार असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने डिंपल मेहता यांची निवड निश्चित मानली जात आहे. भाजपने मराठी उमेदवार न दिल्याच्या निषेधार्थ मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समितीचे सरचिटणीस कृष्णा जाधव यांना नोटीस बजावली आहे. २ फेब्रुवारी रात्री १२ ते १७ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत शहरात मनाई आदेश लागू असून, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे, मिरवणूक काढणे व घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कारवाई केली जाईल, असेही नोटिशीत नमूद आहे. मराठी एकीकरण समितीने मात्र नोटीस बजावण्यात आली तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणार

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT