महापौरांसाठी इनोव्हा हायब्रिड चारचाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापौरांची येत्या ११ फेब्रुवारीला निवड होणार आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर महापौर, उपमहापौरांसह वैधानिक समित्यांचे अध्यक्ष यासाठी नव्या कोऱ्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. महापौरांसाठी ३० लाखांची इनोव्हा हायब्रिड तर अन्य वैधानिक समिती अध्यक्षांसाठी १८ लाखांची स्कॉर्पिओ अशा गाड्या खरेदी करण्यात आल्या असून, वाहतूक विभागाकडे त्यांची नोंदणी झाल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे या वाहनांना भगवा पट्ट्याचा रंग लक्षवेधी ठरणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेला सत्ता मिळाली असून महापौराचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यासाठी ११ फेब्रुवारीला निवड होणार असून, त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण तसेच बेस्ट समिती अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर विशेष समित्या आणि १८ प्रभाग समित्यांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे गेल्या पावणेचार वर्षांमध्ये नगरसेवक आणि पर्यायाने महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला. त्यामुळे आता नवनिर्वाचित महापौर तसेच उपमहापौरांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पार पडली. नवनिर्वाचित महापौरांसाठी नव्याने ‘इनोव्हा एन’ ही गाडी खरेदी करण्यात आली आहे. ही गाडी हायब्रिड (बॅटरी तसेच पेट्रोल) प्रकारातील आहे. अशा प्रकारच्या कारचा वापर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त करीत आहेत. तर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी १२ स्कॉर्पिओंचीही खरेदी करण्यात आली आहे. अध्यक्षांच्या या स्कॉर्पिओ गाड्यांची ओळख व्हावी, म्हणून यावर भगव्या रंगाच्या पट्ट्यांचा वापर केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.