मुंबई

अंबरनाथमध्ये भुरट्या चोरट्यांचा उच्छाद

CD

अंबरनाथमध्ये भुरट्या चोरट्यांचा उच्छाद
सोसायटीतून दोन पाण्याचे मीटर तोडून नेले !
अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) ः अंबरनाथमध्ये भुरट्या चोरट्यांचा उच्छाद सध्या वाढला असून नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशात, एका सोसायटीतून चक्क पाण्याचे मीटर चोरीस गेल्याची घटना घडली असून ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर येथील सोनल पॅलेस सोसायटीच्या आवारात बुधवारी (त. ११) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी सोसायटीची संरक्षक भिंत ओलांडून आत प्रवेश करत तीन पाण्याचे मीटर तोडले. यामध्ये दोन पितळी मीटर चोरून नेण्यात आले, तर एक प्लास्टिकचा मीटर तिथेच टाकून चोरटे पसार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. शिवगंगानगरमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडत असून पोलिस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. तर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक भागांत दोन-दोन दिवस पाणी मिळत नाही, तर काही ठिकाणी नागरिकांना आठ-आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे मीटर चोरीस गेल्याने पाणी वाया जाऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT