छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमली खोपोली नगरी
मध्यरात्रीच्या महाआरतीला शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती; लाठीकाठी प्रात्यक्षिकाने रंगला उत्सव
खालापूर, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी खोपोली नगरी मध्यरात्री दुमदुमून गेली. खोपोली शिळफाटा येथे आयोजित महाआरतीसाठी पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. हाती भगवा ध्वज, शिवप्रतिमा, बाल शिवाजीच्या वेशातील लहानगे तसेच मावळ्यांच्या वेशभूषेतील तरुणाईमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री १२ वाजता नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, मुख्याधिकारी पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक अनिल सानप, पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्यासह शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीला प्रारंभ झाला.
महाआरतीनंतर डीजेच्या तालावर शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. या वेळी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. महामार्गावरील वाहतूक वळवून सुरळीत व्यवस्था ठेवण्यासाठी खोपोली पोलीस कर्मचारी व हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. शिवजयंतीचा उत्सव शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.