मुंबई

रानमेव्यातन घरखर्चाची बेगमी

CD

रानमेव्यातन घरखर्चाची बेगमी
जव्हारच्या आदिवासींना सणासुदीला आधार
जव्हार, ता.१(बातमीदार)ः निसर्गाने भरभरून उधळण केल्याने जव्हारच्या वैभवात भर पडली आहे. अशातच जंगलव्याप्त परिसरातून रानमेव्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात काजू, हिरवी करवंदे, आंब्याच्या कैऱ्या, रानबोरांच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी होत आहे.
आदिवासी महिला पहाटेपासून जंगलातून रानमेवा गोळा करतात. दिवसभराच्या मेहनतीनंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक बाजारात विक्री करतात. सध्या होळी सणाची धामधूम असल्याने रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्च भागवण्यास मदत होत आहे. चैत्र-वैशाख महिन्यात रानमेवा उपलब्ध होत असल्याने जंगल परिसर सुगंधाने दरवळत आहे. रानमेव्याच्या विक्रीमुळे हंगामी रोजगार मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.
--------------------------------
शिरोशी, वनवासी सारख्या भागात प्रगत शेतकऱ्यांनी रानमेव्याचे महत्त्व ओळखून पीक पद्धती निश्चित करत उत्पादन नियोजन केले आहे. शिवाय, रानातील उपलब्ध रानमेवा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.
- सदू अंधेर, किरमिरा
-------------------------------------
महानगरातून येणारे पर्यटक, नोकरदार, शालेय अथवा विद्यार्थी रानमेवा खरेदीसाठी येतात. यामुळे दिवसाला ५०० रुपये रोजगार मिळतो.
- अशोक चिमडा, रानमेवा विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Holika Dahan 2026: यंदा पहिल्यांदाच होळीची पूजा करताय? जाणून घ्या होलिका दहनाची विधिवत आणि योग्य पद्धत

Latest Marathi News Update : महिन्याभरात राज्यातील सगळ्या कार्यालयांचे पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाचे निर्देश

Accidental Death: शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू; बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना, शेतात जनावरे घेऊन गेले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT