मुंबई

नवी मुंबई स्थायी समिती सभापतीपदावर कोणाची वर्णी?

CD

नवी मुंबई स्थायी समिती सभापतिपदावर कोणाची वर्णी?
भाजपच्या १०पैकी एकाच्या गळ्यात माळ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकाच्या महापौरपदी सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड झाल्यानंतर आता पालिकेच्या आर्थिक सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या स्थायी समिती सभापतिपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेची तिजोरी कोणाच्या हाती जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वर्चस्व कायम राहणार, हे स्पष्ट झाले आहे.
२० फेब्रुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून, त्यात भाजपचे १० आणि शिवसेनेचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे सभापतिपदावर भाजपचीच मोहर लागणार, हे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, जयवंत सुतार आणि अशोक पाटील यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे.
मार्च महिन्यात पालिकेचे आर्थिक अंदाजपत्रक सादर होणार असल्याने विकासकामे, धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय बाबींमध्ये स्थायी समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नव्या सभापतींकडून शहराच्या विकासाला गती देत पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट
स्थायी समितीचे राजकारण आणि आर्थिक सत्ता
स्थायी समिती ही पालिकेच्या खर्चावर अंतिम शिक्कामोर्तब करणारी सर्वात प्रभावी यंत्रणा असल्याने सभापतिपदाला विशेष राजकीय महत्त्व असते. याच समितीतून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळत असल्याने हे पद कोणाकडे जाते, यावर पुढील पाच वर्षांतील शहराच्या विकासाची दिशा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT