वडिलांच्या १० लाखांच्या
मुद्देमालावर डल्ला; दोघांना अटक
भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) ः भिवंडीतील एका तरुणीने आपल्या मित्रासोबत पळून जाताना घरातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) घडली. दरम्यान, वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयाकडून १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रेसिडेन्सी प्लाझा या इमारतीमध्ये सोहनलाल चौधरी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांनी सोमवारी (ता. ९) आपल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांच्या घरातील दोन बॅगा घेऊन दोन अनोळखी व्यक्ती घेऊन जाताना आढळल्या. त्यानंतर त्यांनी घरातील कपाटातील पैसे आणि दागिने तपासले असता १० लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सोहनलाल चौधरी यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात आपली मुलगी, तिचा मित्र आर्सलान खान आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.