

From IT Professional to Game Inventor: Sahilraje Shirke’s Mumukshu Hits National Spotlight
Sakal
नितीन बिनेकर
मुंबई : मोबाईल गेम्सच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीसमोर आता भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचा सुगंध असलेला पर्याय उभा राहिला आहे. दादरच्या साहिलराजे शिर्के या मराठमोळ्या तरुणाने ‘मुमुक्षू’ हा जीवनाधारित (लाईफ सिम्युलेशन) बोर्ड गेम तयार केला असून, अल्पावधीतच त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना विचार करायला लावणारा आणि कुटुंबाला एकत्र आणणारा हा खेळ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.